Nothing Ear Stick भारतात लॉन्च, 29 तास चालणार बॅटरी; जाणून घ्या काय आहे किंमत!
नथिंगने भारतात आपले नथिंग इअर स्टिक लाँच केले आहे. हे कंपनीचे दुसरे पेअर इअरबड्स आणि नथिंग फोन नंतरचे तिसरे उत्पादन आहे. (फोटो सौजन्य : nothing website)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्कृष्ट डिझाईन व्यतिरिक्त, हे इयरबड्स 29 तासांपर्यंत प्लेटाइम देतात. यात 12.6 मिमीचा मोठा ड्रायव्हर आहे जो बेस्ट साऊंड क्वालिटी देतो.(फोटो सौजन्य : nothing website)
नथिंग इयर (स्टिक) भारतात 8,499 रुपयांना लॉन्च करण्यात आले आहे. हे इयरबड्स 17 नोव्हेंबर 2022 पासून Myntra आणि Flipkart वरून खरेदी करता येतील.(फोटो सौजन्य : nothing website)
इअरबड्स nothing.tech वर उपलब्ध असतील आणि यूके, यूएस आणि युरोपसह 40 देश आणि प्रदेशांमधील रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असतील. यातल्या प्रत्येक बडचे वजन फक्त 4.4 ग्रॅम आहे.(फोटो सौजन्य : nothing website)
या इयरबड्समध्ये ACTIVE NOISE CANCELLATIONचा पर्याय उपलब्ध नाहीये. पण त्यात bass lock technology दिलेली आहे.(फोटो सौजन्य : nothing website)
नथिंग इयर (स्टिक)चा एकंदर आकार थर्ड-जेन ऍपल एअरपॉड्सची आठवण करून देणारा ठरतोय.(फोटो सौजन्य : nothing website)
नवीन इअरबड्सच्या डिझाइनवर कंपनीने खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही भारतीय बाजारपेठेत अशा प्रकारचे डिझाइन असलेले इअरबड्स क्वचितच पाहिले असतील. अतुलनीय डिझाइन व्यतिरिक्त, हे नवीनतम इयरबड जबरदस्त बॅटरी लाईफसोबत येतात.(फोटो सौजन्य : nothing website)
कंपनीचा दावा आहे की हा डिवाइस 29 तासांपर्यंत प्लेटाइम ऑफर करतो. कंपनीचे सह-संस्थापक कार्ल पेई म्हणतात की इअरबड्सच्या केसला लिपस्टिकचे स्वरूप देण्यात आले आहे. ((फोटो सौजन्य : nothing website)
नथिंग इअर (स्टिक) 10 मिनिटांच्या चार्जिंगवर 2 तासांचा प्लेटाइम देते. वापरकर्त्यांना यात तीन हाय डेफिनिशन माइक मिळतात, जे विंड और क्राउड प्रूफ आहेत.(फोटो सौजन्य : nothing website)