Online Transactions : ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना काय काळजी घ्याल?
कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे बरेच काही बदलले आहे. ट्रान्झॅक्शनपासून ते शॉपिंगपर्यंत आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन होऊ लागल्या आहेत. यामुळे ऑनलाईन फ्रॉडमध्ये देखील वाढ झाली आहे. हॅकर्स लोकांच्या बँक खात्यात नवीन मार्गांनी प्रवेश करत आहेत. मात्र आपली फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेते, ज्याच्या मदतीने तुम्ही पूर्णपणे सुरक्षित ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करू शकता. ऑनलाईन व्यवहार करताना कोणती खबरदारी घ्यावी जाणून घेऊया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअँटी व्हायरस वापरा - आपले डिव्हाइस सुरक्षित करण्यासाठी आणि बग, मेलवेअरपासून संरक्षण करण्यासाठी, त्यात लेटेस्ट अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्टॉल करा. तसेच, डिव्हाइसचा पासवर्ड खूप स्ट्राँग ठेवा. जेणेकरुन हॅकर्स तो पासवर्ड ब्रेक करु शकणार नाही. केवळ चांगल्या कंपनीचा अँटी व्हायरस वापरा.
फिशिंग स्कॅमपासून दूर राहा- बऱ्याचदा आपण काहीही विचार न करता कोणत्याही अॅप किंवा ई-मेलवरील लिंकवर क्लिक करतो, ज्याचे परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात. या व्यतिरिक्त, कोणालाही आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणतेही अॅप इन्स्टॉल करु देऊ नका. यामुळे त्यांना आपल्या स्मार्टफोनचा अॅक्सेस मिळतो.
पर्सनल डिटेल शेअर करु नका- नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या पर्सनल डिटेल जसे जन्मतारीख, निकनेम, खाते क्रमांक, एटीएम पिन इत्यादी कोणाशीही ऑनलाईन शेअर करू नका. तुमचे मित्र असतील तरीही शेअर करु नका. तसेच, कॅशबॅक आणि इतर बक्षिसांच्या जाळ्यात कधीही अडकू नका.
ऑनलाईन खरेदी खबरदारी बाळगा लक्षात ठेवा कोणत्याही वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी करू नका. जर तुम्हाला काही ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर ते ऑथेंटिक वेबसाईट वरूनच ऑर्डर करा. जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंगच्या प्रक्रियेत अशा वेबसाईटच्या जाळ्यात अडकलात तर तुमचे खातेही हॅक होऊ शकते आणि तुमचे संपूर्ण बँक खात्यातील रक्कम साफ होऊ शकते.