Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : पाहताच नजरेत भरणारी Royal Enfield Classic 350 अॅडव्हान्स फीचरसह लॉन्च
रॉयल एनफिल्डने पुन्हा एकदा आपली बाईक क्लासिक 350 भारतात नवीन लूकमध्ये लॉन्च केली आहे. याची बाईकची किंमत 1.84 लाख रुपयांपासून सुरु आहे तर ती 2.51 लाख रुपयांपर्यंत आहे. (Photo : royalenfield)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाईकला डबल क्रेडल चेसिस देण्यात आले आहे. ही शक्तिशाली बाईक पाच प्रकारांमध्ये मिळेल, ज्यात Redditch, Halcyon, Signals, Dark आणि Chrome चा समावेश आहे. (Photo : royalenfield)
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बाईक बाजारात सिंगल आणि ट्विन-सीट पर्यायांसह येऊ शकते. त्याचं डिझाईन सध्याच्या मॉडेलसारखीच असेल. (Photo : royalenfield)
या बाईकमध्ये क्रोम बेझल्स सह रेट्रो स्टाईलचे सर्कुलर हेडलँप, क्रोम-प्लेटेड एक्झॉस्ट, राउंड-शेप रियर-व्ह्यू मिरर असे फीचर्स दिले जाणार आहेत. बाईकमध्ये रुंद हँडलबार, स्पोक व्हील, बॉटल-ट्यूब एक्झॉस्ट मफलर आणि राउंड टेल लॅम्प मिळतील. (Photo : royalenfield)
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईक बाजारात 11 रंग पर्यायांसह लॉन्च करण्यात आली आहे. ज्यात क्रोम रेड, क्रोम ब्रॉन्झ, डार्क स्टील्थ ब्लॅक, हॅल्सियन ग्रीन, हॅल्सियन ब्लॅक, हॅल्सियन ग्रे, रेडडिच सेज ग्रीन, डेझर्ट सँड, रेडडिच रेड, डार्क गनमेटलस मार्श ग्रे यांचा समावेश आहे. (Photo : royalenfield)
नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक 350 नवीन 349cc सिंगल-सिलेंडर फ्युएल इंजेक्टेड एअर एंड ऑइल-कूल्ड इंजिनसह येईल. जे 6100 rp वर 20.2 bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 4000 rpm वर 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. क्लासिक 350 इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. (Photo : royalenfield)
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची स्पर्धा होंडा हनेस सीबी 350 सोबत असेल. या बाईकमध्ये 348.36cc एअर-कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे 21bhp पॉवर आणि 30Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच-स्पीड गिअरबॉक्ससह येते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.86-1.92 लाख रुपये आहे. (Photo : royalenfield)