Tamil Nadu Rains : तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत!
तमिळनाडूची राजधानी चेन्नई आणि आसपासच्या परिसरात पाऊसाच्या तुरळक सरी बरसल्यानंतर आता पुन्हा मुसळधार पाऊस पडत आहे. (Photo tweeted by: @Chinchuvicky)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळ आज संध्याकाळी तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस तमिळनाडूमधील विस्तृत भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo tweeted by: @Chinchuvicky)
हवामान विभागामने दिलेल्या माहितीनुसार, काही बागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. (Photo tweeted by: @Chinchuvicky)
आज तिरुवल्लुर, कल्लाकुरिची, सेलम, वेल्लोर, तिरुन्नामलाई, रानीपेट आणि तिरुपुत्तर या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये मुलळधार पाऊस पडू शकतो. (Photo tweeted by: @Chinchuvicky)
तसेच नीलगिरि, कोयंबटूर, चेंगापल्ट्टू, नमक्कल, तिरुचिरापल्ली, चेन्नई आणि केंद्र शासित प्रदेश पुद्दुचेरी या भागांमध्ये पाऊस पडू शकतो. (Photo tweeted by: @ganant)
तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात पाऊसामुळे झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापार्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. (Photo tweeted by: @ganant)
राज्याची स्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळ आज तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचू शकते. (Photo tweeted by: @ganant)
या चक्रिवादळामुळे 9 राज्यांमध्ये रेड अलर्ट जाहिर करण्यात आला आहे. (Photo tweeted by: @vidyakrithi95)
ईशान्य मान्सूनमुळे तामिळनाडूमध्ये 1 ऑक्टोबरपासून आत्ता पर्यंत नेहमीपेक्षा 50 टक्के जास्त पाऊस झाला आहे. (Photo tweeted by: @vidyakrithi95)
तमिळनाडूमधील 90 प्रमुख जलाशयांपैकी 53 जलाशयातील पाणीसाठा 76 टक्के झाला आहे. (Photo tweeted by: @vidyakrithi95)