In Pics: उत्तम आरोग्यासाठी 'ही' लाल रंगाची फळे आणि भाज्या ठरतात फायदेशीर
Red Fruits And Vegetable: उत्तम तब्येतीसाठी आजकाल डॉक्टर रंगीत फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. लाल रंगाची फळ आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होत असतात. लाल रंगाची फळे आणि भाज्या खाल्ल्याने मधुमेह, ऑस्टिओपोरोसिस आणि उच्च कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या कमी होऊ शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडाळिंब - लाल रंगाच्या फळांमध्ये डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे कर्करोगाचा, विशेषतः प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो.
सफरचंद - सफरचंद हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर फळ मानले जाते. सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
बीट - गडद लाल रंगाच्या बीटमध्ये भरपूर लोह असते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. बीटमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच बीट रक्तदाब कमी करण्यासदेखील मदत करत असते.
टोमॅटो - टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. त्वचा सुंदर करण्यासाठी टोमॅटोचा आहारात समावेश करायला हवा.
कलिंगड - कलिंगड खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होत असतात. कलिंगडामुळे हृदयविकाराचा धोकादेखील कमी होतो. तसेच कलिंगडमुळे लठ्ठपणा कमी होण्यासदेखील मदत होत असते.