PHOTO : अपघाताचा बनाव करत 9 लाखांचा ऐवज लंपास सोलापूरच्या सांगोल्यातील घटना
अपघाताचा बनाव करत 9 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोलात घडलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरुवातील अनोळखी इसमानी कारमधून फिल्मी स्टाईलने पाठलाग करीत दुचाकीला पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात झाल्याचा बनाव केला. नंतर योग्य संधी साधून कारमधील दोघांनी दुचाकीवरील दोघांना दगड आणि हाताने मारहाण करून एकाच्या पॅन्टच्या खिशातून सुमारे 9 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम सोन्याची बिस्किटे, 5 हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल जबरदस्तीने काढून घेतले. सुमारे 9 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज लुटला.
चोरट्यांनी जाताना त्यांची कार पेटवून देवून अपघात झाल्याचा बनाव करीत तेथून दुचाकीवरून धूम ठोकली. सोमवारी रात्री 8.30च्या सुमारास एखतपुर-अचकदाणी रोडवरील बागलवाडी फॉरेस्टच्या हद्दीत ही घटना घडलीय.
याबाबत, सुशांत बापुसो वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्या तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.