Vitthal Mandir : नाव न सांगण्याच्या अटीवर निस्सिम भक्ताकडून विठ्ठलाला 9 लाखांचा सोन्याचा हार अर्पण
एका अज्ञात भाविकाने आज (दि.27) आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचा हार अर्पण केलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नऊ लाख रुपयाचा सुर्य कळ्यांचा सोन्याचा हार गोफासह अर्पण करण्यात आलाय.
सोन्याच्या हाराचे वजन 132 ग्रॅम असून, अंदाजे किंमत 9 लाख 26 हजार आहे.
याबाबतची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
संबंधित दानशुर भाविक हे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत.
ते आज सहकुंटुंब श्रींच्या दर्शनासाठी पंढरपूला आले असता, सदरचे दान दिले आहे.
याशिवाय, त्यांनी मंदिर समितीच्या श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये अन्नदान सेवा देखील अर्पण केली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीला सोने-चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे.
त्यासाठी दोन सराफाची पूर्णवेळ नियुक्ती व संबंधित भाविकांना संगणकीकृत पावती देण्यात येते.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या आणि गरिबांच्या विठ्ठलाला सातत्याने सोन्याचे दागिने अर्पन होताना दिसत आहेत.