Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
नोकरदारवर्गाकडून भविष्यातील निधीची गरज भागवण्यासाठी पगारातून ठराविक रक्कम विविध ठिकाणी गुंतवली जाते. यामध्ये म्युच्यूअल फंडचा देखील समावेश होतो. नोकरीनंतर आपल्याकडे रक्कम असावी यासाठी दरमहा एसआयपीचा पर्याय देखील गुंतवणूकदार वापरत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएखाद्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर 10 कोटींचा कॉर्पस तयार करायचा असल्यास त्यानं 15 हजार रुपयांची एसआयपी सुरु केल्यास किती वर्षांचा कालावधी लागू शकतो हे जाणून घेणार आहेत.
तुम्ही नोकरीत रुजू झाल्यानंतर जितक्या लवकर गुंतवणुकीची सुरुवात करता येईल तितकी करणं आवश्यक आहे. निवृत्तिनंतरच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी लवकर नियोजन करणं आवश्यक आहे.
निवृत्तीनंतर जीवनमान चांगलं राहावं यासाठी तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा कॉर्पोरेटमध्ये असाल तुम्हाला निवृत्तिनंतरचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी गुंतवणुकीचं नियोजन करणं आवश्यक आहे. म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक हा देखील एक चांगला पर्याय आहे.
तुम्ही तुमची आर्थिक स्थिती तपासून गुंतवणुकीला सुरुवात करु शकता. तुम्हाला निवृत्तीनंतर 10 कोटींचा कॉर्पस जमवायचा आहे असं गृहित धरुन नियोजन केल्यास त्यासाठी नेमकं काय करावं लागू शकतं. दरमहा 15 हजार रुपयांची गुंतवणूक करुन साधारणपणे 12 टक्के सीएजीआर ग्राह्य धरल्यास 36 वर्षात 10 कोटींचा कॉर्पस जमा हाईल. यामध्ये गुंतवणूकदाराकडून 64,80,000 ची गुंतवणूक होईल. त्यावर भांडवली परतावा 10,34,97,616 रुपये मिळेल म्हणजेच एकूण 10,99,77,616 रुपयांचा निधी जमा होईल. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)