Solapur: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद
ट्रान्सपोर्ट युनियनने संप मागे घेतला असला तरी आज कांद्याचे लिलाव राहणार बंद राहणार आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल उशिरा लोडींग झाल्याने कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय झालेला होता
त्यानुसार आज बाजार बंद राहणार आहे
सुदैवाने संप मागे घेतल्याची घोषणा झाल्याने उद्या बाजार मात्र सुरू राहतील
रविवार साप्ताहिक सुट्टी, सोमवारी भीमा कोरेगाव दिन यामुळे सलग दोन दिवस बाजार बंद होते
मंगळवारी कांद्याचे लिलाव झाल्यानंतर आज बुधवारी पुन्हा बाजार बंद ठेवण्याची वेळ बाजार समितीवर आलेली होती
केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध करत काम बंद आंदोलन पुकारले होते.
ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आले असून ट्रक चालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत तूर्तास या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला
ट्रक चालकांनी या निर्णयाचे स्वागत करत आपला संप मागे घेतलाय.