Health Tips : तरुणांमध्ये वाढली जिमची क्रेझ! पण चार टिप्स आयुष्य बदलवतील!
आज सर्व वयोगटातील लोक स्वत:ला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी पूर्णपणे गंभीर झाले आहेत. त्यामुळेच जिमबरोबरच योगा, एरोबिक्स, डान्स अशा माध्यमातून आरोग्य घडवण्यात ते गुंतले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधावपळीच्या जीवनात अभ्यास, नोकरी, जबाबदाऱ्यामुळे येणारा ताण कमी करण्यासाठीही ते या माध्यमांचा आधार घेत आहेत. इतकंच नाही तर व्यायामात घाम येण्याबरोबरच खाण्यापिण्याकडेही ते विशेष लक्ष देत आहेत. केवळ मुलेच नव्हे, तर मुलीही आरोग्याबाबत जागरूक झाल्या आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना ना जेवायला वेळ मिळतो, ना शांततेत विश्रांती मिळते. अशा तऱ्हेने त्यांना अकाली आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू लागले आहे. उशीरा झोपण्याची आणि उठण्याची सवयही आरोग्य बिघडवत आहे. यामुळेच सर्वांनाच मॉर्निंग वॉकला जाता येत नाही. अशा लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जिम हे चांगले माध्यम ठरत आहे.
आकर्षक व्यक्तिमत्त्व कोणाला नको असते? व्यक्तिमत्त्व प्रभावी करण्यात सुगठित शरीराचा मोठा वाटा असतो. हेच कारण आहे की लोक वयाला डावलून व्यायाम करत आहेत.
जर तुम्ही रोज जिममध्ये जाऊन कार्डिओ एक्सरसाइज करत असाल तर तुमच्यासाठी प्रोटीन खाणं खूप गरजेचं आहे. पोषणाअभावी आपण आपल्या फिटनेस लक्ष्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही.
प्रथिनांची कमतरता देखील आपल्या व्यायामाच्या मार्गात अडथळे निर्माण करेल. प्रथिनांच्या सेवनासाठी कोणत्याही पावडरवर अवलंबून न राहता पांढरी अंडी, शेंगदाणे, चिकन इत्यादींचा आहारात समावेश करणे चांगले मानल्या जाते . जर तुम्ही शाकाहारी असाल तर दूध, दुग्धजन्य पदार्थ, फळे, ज्यूस, हरभरा, भुईमूग इत्यादींचा आहारात समावेश करा.
आपल्या शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याचा असतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे, त्यामुळे हवामान काहीही असलं तरी पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जातो. पण जर तुम्ही जिममध्ये गेलात तर तुमच्यासाठी जास्त पाणी पिणं अधिक गरजेचं ठरतं. वर्कआऊट दरम्यान आपल्या शरीरातून घामाच्या रूपात भरपूर पाणी बाहेर पडतं. अशावेळी शरीरातील आर्द्रतेची पातळी कायम ठेवण्यासाठी पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा डिहायड्रेशनसारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
अनेकदा असं होतं की ऑफिसमध्ये मित्रांसोबत बर्गर, पिझ्झा सारख्या जंक फूडचं सेवन करता . जंक फूड आपल्या आरोग्यासाठी कोणत्याही बाबतीत योग्य नाही, कारण अशाप्रकारच्या पदार्थांमुळे तुमची तासन्तास केलेली मेहनत क्षणार्धात व्यर्थ ठरते. योग्य व्यायाम करणं जितकं गरजेचं आहे, तितकंच सकस आहार घेणंही तितकंच गरजेचं आहे.
फ्रूट स्मूदी जितक्या सोप्या आणि कमी वेळात बनवली जाते तितकीच ती आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. विशेषत: जेव्हा आपण आपल्या दिनचर्येत शारीरिक व्यायामाला स्थान दिले आहे. लिंबूवर्गीय फळांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश करणे चांगले. यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने तर वाटेलच, शिवाय तुमच्या त्वचेलाही याचा खूप फायदा होईल.
टीप : वर्कआउटला जाण्यापूर्वी ब्रेडवर पीनट बटर खाऊ शकता. तसेच केळी नक्की खावी. यामुळे तुम्हाला व्यायाम करण्याची ऊर्जा मिळेल. कधीही रिकाम्या पोटी व्यायाम करू नये. जर तुमच्याकडे फ्रूट स्मूदी बनवण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर काही फळांचे तुकडे दह्यात कापून रात्री थंड होण्यासाठी आईस क्यूब ट्रेमध्ये ठेवा. यामुळे तुम्हाला ते खाणे सोपे जाईल.