सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला आजपासून होणार सुरुवात
श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या (Siddheshwar Sugar Factory) चिमणी पाडकामाला आजपासून सुरुवात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचिमणी पाडकामपूर्वी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा कारखान्यात दाखल झाला आहे. एक किलोमीटर परिघात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.
रात्रीपासूनच कारखान्यात बसलेल्या शेतकरी सभासद आणि कारखान्याच्या कामगारांना पोलिसांनी पहाटेपासून ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.
आतापर्यंत जवळपास दोनशे हून अधिक कामगार आणि सभासदांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या एक किलोमीटर परिघात कालपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
विमानसेवा आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावरुन सोलापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. साखर कारखान्याच्या सभासदांनी चिमणी पाडण्यास विरोध केला आहे.
सोलापुरातील होटगी रस्त्यावर 350 एकर क्षेत्रात विमानतळ अस्तित्वात आहे. त्यालगतच सिद्धेश्वर साखर कारखाना आहे.
90 मीटर उंच असलेल्या चिमणीमुळं विमानसेवा सुरु करण्यात अडथळा येत आहे.