Cyclone : येत्या 24 तासांत बिपरजॉय भारताच्या किनारपट्टीवर धडकणार, चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला
बिपरजॉय चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे प्रशासन अलर्टवर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतितीव्र चक्रीवादळ बिपरजॉय गुजरात किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
image 4
मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्ट्टी भागात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या भागातील जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रात उंच लाटा उसळल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग 150 किमी प्रतितास आहे.
चक्रीवादळ आता वेगाने गुजरातकडे सरकत आहे. किनारपट्टी भागात तटरक्षक आणि एनडीआरएफ पथकं तैनात करण्यात आली आहेत. हा बिपरजॉय चक्रीवादळाचा ट्रेलर असल्याचं म्हटलं जात आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह महाराष्ट्रात दिसून येत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे.
किनारपट्टी भागातील सुमारे 30 हजार नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.
गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनला संध्याकाळी धडकण्याचा अंदाज आहे. कच्छ भागात याचा सर्वाधिक प्रभाव पडेल.