Farmers Protest : एमएसपीवरून शेतकऱ्यांचं पुन्हा आंदोलन, दिल्ली-हरियाणा राष्ट्रीय महामार्ग केला बंद
सोमवारी भारतीय किसान युनियनने राष्ट्रीय महामार्ग 44 च्या जवळ पिपली येथे 'एमएसपी दिलाओ, किसान बचाओ महापंचायत' आयोजित केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहापंचायतच्या बैठकीनंतर सर्व शेतकरी राष्ट्रीय महामार्गावर हजारोच्या संख्येने जमले आणि महामार्ग बंद केला. यामुळे पोलिसांनी दिल्ली शहरातून येणारी सर्व वाहने कुरूक्षेत्र बायपासकडे वळविले.
या विराट महापंचायत आनंदोलनात भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैतही सहभागी झाले होते. याशिवाय बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन पुकारणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनियाही समर्थनार्थ सहभागी झाला होता.
या शेतकऱ्यांकडून मागण्या मान्य होईपर्यंत राष्ट्रीय महामार्ग-44 पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महामार्ग दिल्ली-कुरूक्षेत्र-अमृतसर यांना जोडतो.
कुरूक्षेत्रचे उपायुक्त शांतनु शर्मा यांनी पीटीआयला सांगितल्यानुसार, MSP च्या किमतीनुसार सूर्यफुलाच्या बियांच्या खरेदीचा मुद्दा सोडविण्या येईल. यासाठी रविवारपासून जिल्हा प्रशासन, भारतीय किसान युनियनच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे.
6 जून रोजी शहाबाद येथे भारतीय किसान युनियनचे प्रमुख गुरनाम सिंह चढूनी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी MSP च्या मागण्यांवरून राष्ट्रीय महामार्ग 6 तासांसाठी बंद केला होता.
सोमवारी 12 जून रोजी महापंचायतमध्ये सहभागी झालेले किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की, 'किमान हमी भावाच्या दराने सरकारने सूर्यफुलाच्या बियांची खरेदी करायल हवी. यासोबत शहाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या शेतकरी नेत्यांना सोडण्यात यावे.'
यावेळी टिकैत यांनी घोषणा केली की, 'केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार MSPसाठी कायदा आणला नाही तर संयुक्त किसान मोर्चा अखिल भारतीय आंदोलनला सुरूवात करेल.'
यादरम्यान टिकैत म्हणाले की, सरकार आता केंद्राने निश्चित केलेल्या MPS च्या किमतीवर सूर्यफूलाची खरेदी करण्यास नकार देत आहे. ते पुढे म्हणाले की, भविष्यात ते MPS च्या किमतीवर गहू आणि धान्यासहित इतर पिकही घेण्यास नकार देऊ शकतात.