Solapur Chimney Demolish : सोलापूरची विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी जमीनदोस्त!
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडकामास अखेर सुरुवात करण्यात आलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया चिमणीमुळे सोलापूरच वातावरण अनेकवेळा तापलेलं पाहायला मिळालं.
2014 साली सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या विस्तारीकरणातून सह वीज निर्मितीसाठी 92 मीटर उंचीची चिमणी उभरण्यास सुरुवात केली.
मात्र, ही चिमणी सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा असल्याने ती पडण्याची मागणी अनेकांनी केली.
नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अखेर पाडण्यात आली.
काही सेकंदात ही चिमणी जमीनदोस्त झाली. पोलीस प्रशासनाने कारखान्याच्या चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
सोलापूरला विमानसेवा सुरु व्हावी हे उद्दिष्ट ठेवून या चिमणीवर कारवाई करण्यात आली आहे.
चिमणीवरील कारवाईनंतर तरी सोलापूर शहराला विमानसेवा मिळते का? शेतकऱ्यांचे अस्तित्व असलेल्या कारखान्याचे काय होते हेही पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
आज पहाटे शेकडो पोलिसांचा फौजफाटा कारखान्यात दाखल झाला होता, जवळपास 500 हून अधिक शेतकरी सभासद, कामगार आणि कारखाना समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेत कार्यवाही केली
विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी जमीनदोस्त