Ashadhi Wari 2023 :आषाढी यात्रेसाठी 100 टन कुंकू, बुक्क्याची निर्मिती पूर्ण
आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक पंढरपूर येथून नेहमीच सौभाग्यालंकार म्हणून ओळखले जाणारे कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करण्यास प्राधान्य देत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेषतः महिला भाविक यात्रा संपवून जाताना कुंकू, बुक्का, अष्टगंध, चंदन याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात.
एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांकडून जवळपास 100 टन कुंकू आषाढीच्या काळात लागत असते.
यात्रा काळात नुसत्या कुंकवाची उलाढाल 10 ते 15 कोटी रुपयाची होत असल्याने व्यापाऱ्यांसाठी हा मोठा सुगीचा काळ असतो.
कुंकू बनवताना पहिल्यांदा ग्राईंडरमध्ये बारीक एकजीव करुन घेऊन मग मिक्सरमध्ये टाकून फिरवले जाते. यावेळी या मिश्रणात ठरलेले मिश्रण केल्यावर लाल रंगांच्या विविध छटात कुंकू तयार होते.
तयार केलेले हे कुंकू वाळवण्यासाठी उघड्यावर पसरुन ठेवत त्याला ऊन दिले जाते.
चांगल्या प्रतीच्या बुक्क्याची निर्मिती तुळशी अथवा इतर लाकडाच्या भुश्यापासून होते तर दुसऱ्या दर्जाचा बुक्का हा कोळशाच्या भुकटीपासून तयार होतो.
कुंकवाप्रमाणेच अष्टगंध, गुलाल आणि बुक्का देखील तयार केल्यावर वाळवण्यासाठी बाहेर ठेवावा लागतो.
येथे जवळपास 800 किलो कुंकवाचा उंच ढीग एक परातीत लावण्यात येतो याला परात लावणे हा शब्द पंढरपूरमध्ये रुढ झाला आहे.
ही प्रथा वारकरी संप्रदाय पिढ्यानपिढ्या पाळत आला असल्याने मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग परिसरात शेकडो कुंकू व्यापाऱ्यांची दुकाने आणि यामुळेच आषाढी यात्रेत कुंकवाची बाजारपेठ मोठी मानली जाते.