Shell Pakistan : महागाईने होरपळलेल्या पाकिस्तानी जनतेसमोर नवं संकट, पेट्रोल-डिझेल दरवाढीची भीती
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या समस्या काही संपायचं नाव घेत नाहीत. एखादे संकट संपण्याआधीच नवे संकट समोर उभं राहत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. महागाई दर 29 टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. यामुळे सर्वसामान्य लोकाचं जगणं कठीण होत आहे.
या भीषण आर्थिक संकटामुळे सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.अलिकडेच गव्हाची भीषण टंचाई निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.
आता यापुढील काळात डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे निर्माण होणाऱ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. याची पाकिस्तानी नागरिकांना भीती वाटत आहे.
खरंतर मल्टिनॅशनल पेट्रोलियम कंपनी शेलने पाकिस्तानच्या मार्केटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कंपनी आपला पाकिस्तानातील व्यवसाय विकून टाकण्याची तयारी करत आहे.
शेल कंपनीचे म्हणणे आहे की, विनिमय दर, पाकिस्तानी रुपयाची घसरण आणि थकबाकी या कारणामुळे गेल्या वर्षी मोठे नुकसान सोसावं लागलं आहे.
शेल ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी कंपनी आहे. देशातील सर्व पेट्रोल पंपांचे नेटवर्क शेल चालवते. या परिस्थितीत शेल कंपनी बाहेर पडली तर हे पेट्रोल पंप बंद पडू शकतात.
याशिवाय शेल पाकिस्तानजवळ पाकिस्तान-अरब पाइपलाइन कंपनीमध्ये 26 टक्के हिस्सा आहे. हा हिस्साही कंपनी विकण्याची तयारी करत आहे. यामुळे आता पाकिस्तान समोर पेट्रोल-डिझेलचं भीषण संकट उभं राहू शकतं.