PHOTO : सोलापुरातील श्री सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात, कुंभार वाड्यात 56 गाडग्यांची विधीवत पूजा
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात्रेच्या पहिल्या दिवशी धार्मिक विधींना सुरुवात होते.
यात्रेचे प्रमुख मानकरी असलेल्या हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड मानकरी असलेल्या शेटे यांच्या वाड्यात आणला जातो.
त्या ठिकाणी हिरेहब्बू यांच्या हस्ते योगदंडाची विधीवत पूजा पार पडते.
त्यानंतर होमहवन आणि अॅड. मिलिंद थोबडे हे पादपूजा करतात.
तत्पूर्वी मानकरी असलेल्या कुंभार यांच्या वाड्यातून 56 गाडगे यात्रेतील प्रमुख मानकरी असलेल्या हिरेहब्बू यांना स्वाधीन केले जातात.
कुंभार वाड्यात या 56 गाडग्यांची विधिवत पूजा करुन कुंभार बांधव वाजत गाजत हे मडके घेऊन हिरेहब्बू यांच्या वाड्याला जातात.
श्री सिद्धेश्वरांची ही यात्रा म्हणजे कुंभार कन्येचा महाराजांच्या योगदंडाशी होणारा प्रतिकात्मक विवाह सोहळा.
या विवाह सोहळ्यात हे 56 गाडगे वापरले जातात. तैलभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदिपन सोहळ्याला हे गाडगे वापरले जातात.