Photo : राज्यात थंडी वाढली, अनेक ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली
राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंशाच्या खाली गेलं आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आला आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. नंदूरबारमध्ये तापमान 10 अंशाच्या खाली गेलं आहे.
सध्या राज्यातील तापमानात (Temperature) चढ उतार होत आहे. राज्यात कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) वाढला आहे. अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढल्यानं शेकोट्या पेटल्या आहेत.
नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. नंदूबार जिल्ह्यात या वर्षातील सर्वात कमी म्हणजेच 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना (Rabi Crop) फटका बसण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा जोर वाढल्याचा परिणाम शेतीवरही होत असल्याचं चित्र दिसत आहे.
गहू , हरभरा, रब्बी ज्वारी या पिकांवर थंडीचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. त्वरीत उपाययोजना करण्याचे कृषी विभागानं आहवान केलं आहे.
परभणी जिल्ह्यात मागच्या 4 दिवसांपासून तापमानात मोठी घट झाल्याने सर्वत्र थंडीचा कडाका पडला आहे. आजही तापमान 7 अंशावर असल्याने जिल्हाभरात कडाक्याची थंडी पडली आहे.
महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा 7 अंशावर गेला आहे. वेण्णालेक परिसरातील पारा 5 अंश सेल्सिअस आहे.
जळगाव तापमानाचा 7.5 अंशावर गेला आहे. तर पुण्याचा पारा 9 अंशावर घसरला असल्यानं जोराची थंडी वाढली आहे.
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. येथील अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंशाच्या खाली गेले आहे.