PHOTO: औरंगाबादच्या विमानतळावर उतरताच अजित पवार थेट सिग्मा रुग्णालयात
सकाळी आठ वाजेच्या दरम्यान त्यांचे चिखलठाणा विमानतळावर आगमन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेतेमंडळी आधीपासूनच उपस्थितीत होते.
मात्र नेत्यांचे स्वागत स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी आपला ताफा थेट औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात वळवला.
तसेच सिग्मा हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची भेट घेतली.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर 31डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता.
तरमळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सिग्मा हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.
त्यामुळे अजित पवारांनी दौऱ्यात उल्लेख नसतानाही आधी जखमी तरमळे यांची भेट प्रकृतीची विचारपूस केली.
तसेच तरमळे यांच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून त्यांना धीर देखील अजित पवारांनी दिला.