Republic Day 2024: विठ्ठलाच्या गाभाऱ्याचे सौंदर्य फुलले तिरंग्याच्या रंगांनी, विठ्ठल मंदिरालाही आकर्षक सजावट
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आज विठुरायाचे मंदिर तिरंगी रंगात रंगले आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिरात आकर्षक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे .
पुण्यातील येथील एका भक्ताने ही फुल सजावटीची सेवा देवाला अर्पण केली आहे .
झेंडू , गुलछडी, मोगरा अशी फुले आणि पानांचा वापर करून ही सजावट केली आहे .
देशाच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विविध सण, उत्सव, स्वातंत्र दिन अशा महत्त्वाच्या दिवशी देवाला विशेषरित्या सजवण्यात येते.
संपूर्ण गाभारा हा फारच आकर्षक दिसत आहे. गाभारा आणि सर्व सजावट करण्यासाठी फुलांचा वापर करण्यात आलाय.
या सोबत देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या अंगावर आज तिरंगी उपरणे देखील घालण्यात आले आहे.
या सजावटीबरोबरच पारंपरिक पोषाख आणि दागिन्यांमध्ये देवाचे रूप अधिक खुलून दिसत आहे.