health benefits : जायफळ खाण्याचे चमत्कारी फायदे; तुम्हालाही उपयोगात येतील
आपल्या देशाला विविध मसाल्यांची समृद्ध देणगी लाभली आहे. मसाल्यांचा वापर हा खाद्यपदार्थांपासून ते आरोग्याशी संबंधित समस्यांपर्यंत केला जातो.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या स्वयंपाकघरात मसाल्यांना एक विशेष स्थान आहे, जिथे त्यांचा वापर आवश्यकतेनुसार केला जातो. (Photo Credit : Pixabay)
या मसाल्यांपैकीच एक असलेले जायफळ अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते. जायफळाचा गोड वास हा आपल्याला मोहित करून टाकतो. जायफळ भले ही भारतातील असंख्य स्वयंपाकघरांमध्ये वापरले जात असले तरी त्याचे उत्पादन हे इंडोनेशियामधून केले जाते. (Photo Credit : Pixabay)
इंडोनेशियामध्ये आढळणाऱ्या मायरिस्टिका या झाडापासून जायफळ मिळते. जवळजवळ सर्व मसाल्यांप्रमाणे, त्याचा वापर केवळ चव वाढवण्यासाठीच केला जात नाही तर ते अनेक औषधांमध्ये ही वापरले जाते. जायफळ हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.(Photo Credit : Pixabay)
काही विशिष्ट पदार्थांमध्ये आपण जायफळचा वापर करत असतो. परंतु जायफळाचे आपल्या शरीरास खूप चमत्कारी फायदे होतात. (Photo Credit : Pixabay)
जायफळमध्ये अनेक औषधी गुण असतात. पेन रिलिव्ह, पोटाचे दुखणे, शरीरातील घाण काढणे, रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे व दातांची निघा राखणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे, त्वचा चमकावणे असे अनेक कार्य करते. (Photo Credit : Pixabay)
जायफळ हा एक मसाला आहे, जो जायफळाच्या झाडापासून फळांच्या स्वरूपात आपल्याला मिळतो. त्याचे वैज्ञानिक नाव मायरिस्टिका फ्रॅग्रन्स (Myristica fragrans) आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जायफळाच्या झाडापासून दोन मसाले मिळतात त्यातील एक जायफळ आणि दुसरे जावित्री होय.(Photo Credit : Pixabay)
मायरिस्टिकाच्या झाडापासून मिळणाऱ्या फळांच्या बियांना जायफळ असे म्हणतात. जायफळाच्या बिया या एक प्रकारच्या सालीने झाकलेल्या असतात, ज्याला जावित्री असे म्हणतात.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)