Ramabai Ambedkar Birth Anniversary : सोलापुरात माता रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी!
सोलापुरातल्या आर. एस. मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्यावतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दीपोत्सवमुळे डॉ. आंबेडकर उद्यान 25 हजार दिव्यांनी उजळला.
या दीप महोत्सवाचे उदघाटन पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यागमूर्ती रमाई यांच्या या जयंती उत्सव निमित्ताने एक दिवा त्यागाचा हा उपक्रम राबविण्यात आला.
हा नयन्यरम्य सोहळा अनुभवण्यासाठी सोलापूरकरानी देखील मोठी गर्दी या ठिकाणी केली होती.
माता रमाई या त्यागाचे प्रतीक आहेत, त्यांच्या जीवनातून प्रत्यकाने प्रेरणा घेणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी दिली.
यावेळी संस्थेचे संस्थापक रविंद्र सरवदे, शाहूराजे प्रतिष्ठानचे सचिन वाघमारे, सुधाकर गुंडेली, मदन वडावराव, राज्जया गज्जम, आनंद गोरट्याल,बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे अजित गादेकर, भिममुद्रा प्रतिष्ठानचे सुजित अवघडे, निखिल कोयले,अमर कांबळे, सोहन लोंढे, रोहित जगताप,विनय रायकर, समीर नदाफ, सागर बाबरे आदी उपस्थित होते.
रोटर मशीनचा वापर करुन स्टॅंन्डच्या सहाय्याने यावेळी दिवे प्रकाशित करण्यात आले होते.
सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा दीपोत्सव साकार करण्यात आला होता. हा दीपोत्सव पाहण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.