Belgaon: बेळगावात वारकऱ्यांचं 'भजन' आंदोलन, पंढरपूरला रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी
पंढरपूरला वारकऱ्यांना जाण्यासाठी बेळगावमधून दिवसातून दोन वेळा रेल्वे सेवा सुरू करावी या मागणीसाठी वारकऱ्यांनी रेल्वे स्थानक परिसरात भजन करून निवेदन दिले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेळगावहून पंढरपूरला दररोज पूर्वी रेल्वे सेवा होती. पण कोविड काळात ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली.
नंतर आठवड्यातून एकदा पंढरपूरला रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. बेळगावमधून पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दररोज रेल्वे सेवा नसल्यामुळे वारकरी आणि विठ्ठल भक्तांची अडचण होत आहे.
त्यामुळे पूर्वीप्रमाणे दिवसातून दोन वेळा बेळगावहून पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे प्रिन्सिपल चीफ कमर्शिअल मॅनेजर ए. एस. राव यांना बेळगाव जिल्हा वारकरी संघ आणि श्री राम सेना हिंदुस्तान तर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी बेळगाव जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष हभप शंकर बाबली महाराज, रमाकांत कोंडुस्कर, समिती नेते रणजीत चव्हाण-पाटील, सुनील आपटेकर, द-प रेल्वे विभागाच्या असिस्टंट कमर्शियल मॅनेजर निवेदिता, स्टेशन मास्टर, हभप सं. बं. हणमंताचे, संतराम पाटील, ज्ञानेश्वर पवार, पांडुरंग जाधव आदींसह वारकरी मंडळी उपस्थित होती.