राज आणि सिमरनच्या प्रेमाची जादू पुन्हा रूपेरी पडद्यावर; व्हॅलेंटाईन वीकनिमित्त DDLJ चा खास शोज
'बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है', 'अगर ये तुझे प्यार करती है तोह यह पलट के देखेगी. पलट.. पलट!' या एव्हरग्रीन डायलॉग्सनं सजलेला डीडीएलजे म्हणजेच दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे (Dilwale Dulhania Le Jayenge) हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीनं बघतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा मंदिर या चित्रपटगृहात हा चित्रपट बघण्याची मजा काही औरच!
डीडीएलजे या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटामधील राज आणि सिमरन यांच्या प्रेमकथेनं अनेक तरुणांच्या मनात घर केलं.
आता राज आणि सिमरनची ही प्रेमकथा पुन्हा रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
व्हॅलेंटाईन वीकच्यानिमित्तानं डीडीएलजे चित्रपट पुन्हा रुपेरी पडद्यावर रिलीज करण्याचा निर्णय यशराज फिल्म्सनं घेतला आहे. याबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन यशराज फिल्म्सनं ही माहिती सिनेप्रेमींना दिली आहे.
पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीस या चित्रपटगृहातमध्ये दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपट 10 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार आहे.
1995 मध्ये दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज होऊन 28 वर्ष झाली आहेत.
दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट आदित्य चोप्रानं (Aditya Chopra) दिग्दर्शित केला. या चित्रपटाची निर्मीती यशराज फिल्मनं केली आहे.
दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटात अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) राज ही भूमिका साकारली तर अभिनेत्री काजोलनं (Kajol) सिमरन ही भूमिका साकारली.