Vitthal Mandir Diwali 2023 : दिवाळीनिमित्त विठ्ठल-रुख्मिणी मंदिराला फुलांची सजावट, दिपावलीची सुरुवात विठ्ठल दर्शनानं
सर्वत्र दिपावलीचा उत्साह पाहायला मिळत असून पंढरपूरचं विठ्ठल-रुख्मिणी मंदिरही या उत्साहात न्हाऊन निघालं आहे. (Image Source : Shri Vitthal Rukimini Mandir Samiti)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीच्या पहिल्या दिवशी विठुरायाचा गाभारा सुंदर फुलांनी सजला आहे. रुख्मिणी माता मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (Image Source : Shri Vitthal Rukimini Mandir Samiti)
आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी मंगलमय सुरुवात करण्यासाठी भाविकांनी विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात गर्दी केली आहे. (Image Source : Shri Vitthal Rukimini Mandir Samiti)
लाडका विठुराया आणि रुख्मिणी मातेच्या दर्शनानं दिवाळीची सुरुवात करण्यासाठी भक्तांची मंदिरात लगबग पाहायला मिळत आहे. (Image Source : Shri Vitthal Rukimini Mandir Samiti)
विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात पिवळ्या आणि भगव्या झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (Image Source : Shri Vitthal Rukimini Mandir Samiti)
यासोबतच हिरवी पाने आणि मोगऱ्यांच्या फुलांचीही सजावट करण्यात आली आहे. (Image Source : Shri Vitthal Rukimini Mandir Samiti)
दिवाळीनिमित्त पंढरपुरमधील विठ्ठल मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (Image Source : Shri Vitthal Rukimini Mandir Samiti)
मंदिरातील नामदेव महाद्वारावर पारंपरिक पद्धतीचा चांदणीचा आकाशदिवा लावण्यात आला आहे. (Image Source : Shri Vitthal Rukimini Mandir Samiti)
विठ्ठल सभागृहात देखील मोठा आकाशदिवा लावण्यात आला आहे. (Image Source : Shri Vitthal Rukimini Mandir Samiti)
भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली आहे. (Image Source : Shri Vitthal Rukimini Mandir Samiti)