पंढरपूरमध्ये रस्त्यांची दुरावस्था, वाहनचालकांसह भाविकांचे हाल
पंढरपूर (Pandharpur) शहरात रस्त्यांची (Roads) दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे. अनेक मुख्य रस्त्यांची चाळण झाल्यानं वाहनचालकांसह भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपूर (Pandharpur) शहरात रस्त्यांची (Roads) दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे.
अनेक मुख्य रस्त्यांची चाळण झाल्यानं वाहनचालकांसह भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरामधील स्टेशन रोड, सरगम चौक, कॉलेज रस्ता, बस स्थानक या प्रमुख ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत.
वाहतुकीवर परिणाम होत आहे. या परिसरात धीम्या गतीनं वाहतूक सुरु आहे.
रस्त्याचे काम पूर्ण करून एक महिनाही झाला नसताना पंढरपुरात ठिकठिकाणी रस्ते उखडले आहेत.
वाहन चालकांसह पंढरपूरमधील नागरिकांना आणि भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आषाढी वारी होऊन अजून एक महिनाही झाले नाही. तोच पहिल्याच पावसात पंढरपूरमधील या नगरपालिकेने दुरुस्त केलेल्या रस्त्याची चाळण झाली आहे
नगरपालिका प्रशासनावर या कामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाबद्दल पालिकेने ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे.
पंढरपूरमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.