Rain Update: अर्ध्या महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस; रत्नागिरी, रायगडसह 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट; पाहा तुमच्या विभागातील पावसाची आजची स्थिती
हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड आणि रत्नागिरीत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांतील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी देखील आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. येथे आज मुसळधार पाऊस बरसणार आहे.
पालघर, ठाण्यासह मुंबईत आज ऑरेंज अलर्ट कायम आहे. या ठिकाणच्या काही भागांच आज मुसळधार पाऊस पडू शकतो.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसेल.
रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.