PHOTO : घटस्थापनेनिमित्त विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक आरास
घटस्थापनेनिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक आणि नयनरम्य आरास करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजची आरास पुण्याचे भाविक राम जांभुळकर यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या पवित्र उत्सवाची सुरुवात आज घटस्थापनेने झाली.
नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यंदाच्या वर्षी 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या काळात नवरात्रोत्सव आहे.
या नऊ दिवसांच्या काळात देवीच्या विविध अशा नऊ रुपांची पूजा करण्यात येते.
या काळात नऊ दिवस भाविक मनोभावे देवीची पूजा करतात आणि त्यासोबतच उपवास देखील करतात.
विविध सण आणि उत्सवांच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात फळाफुलांची सजावट करण्यात येते.
विठुराया आणि रुक्मिणी मातेचं हे अनोखे रुप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची गर्दी होते.