वारली चित्रकलेनं सजले महाराष्ट्रातील एव्हरेस्ट

पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अहमदनगर अकोले येथे जाऊन महाराष्ट्रातील उंच शिखराला वारली चित्रकलने सजवले..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संदीप आंबात, विकास नडगे, महेंद्र लहांगे, प्रकाश कोम, नागेश पागी, किरण गिराणे, नयन धाडगा ह्यांनी शनिवार रविवार दिनांक 24/25 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मंदिर कळसूबाई ह्या मंदिराला वारली चित्रकला काढून मंदिर सुशोभित केले आहे...

वारली चित्रकला महाराष्ट्राच्या शिखराला
भंडारदरा कळसूबाई नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
आदिवासी समाजाची कुलदैवत असलेली कळसूबाई शिखरावर दरवर्षी लाखो भक्त पर्यटक शिखराला नवरात्रीत भेट देतात.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व 1646 मीटर उंच असलेल्या ह्या शिखराला सर करण्याचे सर्व ट्रेकर्स पर्यटकांचे स्वप्न असते..
ह्या शिखराला राज्यातून देशातून खूप लोक भेट देतात..
वारली चित्रकला काढून आदिवासी संस्कृति टिकविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ह्या मंदिर सुशोभित करण्यासाठी स्थानिक शिखराचे पायथ्याचे गाव जहागीरदारवाडी ह्या ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ खाडे आणि सरपंच हिरामण खाडे ह्याच्या सहकार्यमुळे हे शक्य झाले.
महाराष्ट्रातील एव्हरेस्ट सजले वारली चित्रकलेनं