Navratri 2023 : सातव्या माळेला रुक्मिणीला महालक्ष्मीचा पोषाख, विठुरायाही सजला पारंपारिक दागिन्यांत; पाहा फोटो
तब्बल 26 प्रकारचे अतिशय मौल्यवान आणि ठेवणीतील दागिन्याने रुक्मिणी मातेला सजवण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकमरेवर हात ठेऊन उभ्या असणाऱ्या रुक्मिणी मातेची महालक्ष्मी रूपात पूजा बांधताना अतिशय कल्पकतेचा वापर केला आहे .
मातेला मोरपंखी रंगाची भरजरी पैठणी महालक्ष्मीच्या पद्धतीने नेसवण्यात आली होती .
मोहरांची माळ , खड्याची वेणी , पाचूची गरसोळी , चिंचपेटी , सोने ठुशी , सूर्य , बाजीराव गरसोळी , मणी मोत्यांच्या पाटल्या , घुंघराचा कंठा , मस्त्य जोड , मोठी नथ , कर्णफुले , पुतळ्याची माळ , मोठा चंद्रहार , लहान चंद्रहार , अष्टपैलू लहान आणि मोठी कंठी , सोन्याचे पैंजण , रूळ जोड , कोल्हापुरी साज , जडावाचे तानवड , नवीन ठुशी , हिर्या माणकांचे बाजूबंद , हिऱ्यांचे मंगळसूत्र आणि हिरेजडित सुवर्ण मुकुट असे 26 प्रकराचे दागिने चढवण्यात आले आहेत.
भाळी चंदनाचा वैशिष्ट्यपूर्ण मळवट आणि त्यावर दागिन्याचा साज यामुळे विठ्ठल मंदिरात कोल्हापूरची महालक्ष्मीमाता अवतरल्याचा आभास होत होता .
विठ्ठलाला किरमिजी रंगाच्या मखमली अंगीवर भरजरी पितांबर परिधान करण्यात आले होते .
यावर विठुरायाला सोन्याच्या नक्षीचा मुकुट , मौल्यवान कौस्तुभ मणी , हिरेजडित दंडपेट्या , हिरेजडित मत्स्य , सोन्याचे तोडे , मोत्याच्या कंठी , मारवाडी पेटयाचा मोत्याचा हार , सोन्याची तुळशी माळ , मारवाडी पेटयाचा सोन्याचा करदोडा , बाजीराव कंठी , हिऱ्याचा कंगन जोड , बालाजी नाम अशा अतिशय दुर्मिळ दागिने परिधान करण्यात आले होते.
यावेळी मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.