बाळवंटात फुलवली तैवानी गुलाबी पेरुंची बाग
एका राजस्थानमधील शेतकऱ्याने वाळवंटात तैवानच्या गुलाबी पेरुची बाग फुलवली आहे. या गुलाबी पेरुपासून हा शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजस्थानचे शेतकरीही आता केळी, सफरचंद, संत्री, आवळा आणि खजूर यांची देखील आधुनिक पद्धतींनी लागवड करत आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक पटींनी वाढले आहे. विशेष बाब म्हणजे आता राजस्थानचे शेतकरी तैवानच्या गुलाबी पेरुची लागवड करत आहेत.
राजस्थानमध्ये फक्त खजूरच पिकवता येतात असं लोकांना वाटतं, पण असं नाही. शेतकरी बांधव राजस्थानमध्येही फळांची लागवड करु शकतात.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी तैवानच्या गुलाबी पेरूची लागवड करण्यास सुरुवात केली आहे
मेहनतीने ओसाड जमिनीवर तैवानच्या गुलाबी पेरुची सुंदर बाग फुलवली आहे. यामुळे त्यांना वर्षभरात भरघोस उत्पन्न मिळत आहे.
गतवर्षी शेतकरी लेखमाराम यांनी प्रति रोप 3 किलो पेरू तोडला होता. परंतु यावर्षी त्याचे उत्पादन प्रति रोप 10 किलो तैवान गुलाबी पेरू इतके वाढले आहे. अशा प्रकारे त्यांनी यावर्षी सुमारे 1500 किलो पेरूची विक्री केली, त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागू झाला तेव्हा तो उरलेल्या वेळेत यूट्यूब पाहत असे. येथेच त्यांना तैवानी पेरू लागवडीची माहिती मिळाली.
तैवानच्या गुलाबी पेरूचे उत्पादन येत्या काही वर्षांत आणखी वाढेल, ज्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल.