Kamada Ekadashi, Pandharpur: देव माझा विठू सावळा... कामदा एकादशीनिमित्त सूर्यफुलांनी सजला विठुरायाचा गाभारा
विठुरायाची पंढरी हरिनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुर्यफुलांनी विठुरायाचा गाभारा फुलून गेला आहे.
रुक्मिणी मातेचा गाभाराही सूर्यफुलांनी सजवण्यात आलाय.
चैत्र शुद्ध एकादशी ही मराठी महिन्यातील पहिली मोठी यात्रा असते.
शिखर शिंगणापूर येथे शंभो महादेवाच्या विवाहनिमित्त देव विवाह सोहळ्यास हजर होते आणि लग्नात पुरणपोळीचे भोजन असल्याने आज सर्व वारकऱ्यांचा एकादशीचा उपवास असताना विठुरायला मात्र आज सकाळी पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.
आज दिवसभर रुक्मिणी मातेला उपवासाचा नैवेद्य असतो तर संध्याकाळी देवालाही उपवासाचा नैवेद्य दाखवण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे.
त्यामुळे आज देवाची लंगडी एकादशी मानली जाते.
आज चैत्री एकादशीच्या सोहळ्यासाठी जवळपास चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले
देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे.