Health Tips : वर्कआऊट करताना खाण्यापिण्याची काळजी कशी घ्याल? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
तुम्ही रोज किती वेळ वर्कआऊट करता आणि किती घाम गाळता, याने काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमच्या वर्कआऊटचा परिणाम तोपर्यंत दिसू शकणार नाही, जोपर्यंत तुम्ही योग्य आहार घेत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तम आरोग्य आणि फिटनेससाठी अनेकजण रोज कित्येक तास वर्कआऊट करतात. मात्र फक्त वर्कआऊटनं हे साध्य होतं का? तर नाही. तुम्ही रोज किती वेळ वर्कआऊट करता आणि किती घाम गाळता, याने काहीही फरक पडत नाही. त्यासाठी उत्तम आहारही तितकाच महत्वाचा आहे. तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.
केळी – स्नायूंना बळकटी येण्यासाठी केळी उपयुक्त ठरतात. त्यामुळे वर्कआऊटआधी केळी खाणं आवश्यक आहे.
पनीर – पनीरमध्ये साखरेचं प्रमाण कमी आणि प्रोटिन अधिक असतं. वर्कआऊटआधी पनीर खाणं हा चांगला पर्याय आहे.
फ्रूट स्मूदी – कार्बोहायड्रेट्स फ्रूट्सच्या स्मूदीमुळे शरीर कणखर आणि मजबूत बनण्यासाठी मदत होते. शिवाय, दिवसभर चेहऱ्यावर एकप्रकारचं तेज राहतं.
कॉफी – वर्कआऊटआधी कॉफी पिणंही एक चांगला पर्याय आहे. कॉफी शरीरात इंधनाप्रमाणे काम करते.
अंडी – अंडी खाल्ल्याने विशेषत: वर्कआऊटआधी अंडी खाल्ल्याने शरीराला एक वेगळी ऊर्जा मिळते.
चणे – वर्कआऊटआधी प्रोटिन आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असलेले चणे खायला हवेत.
ओट्स – ओट्समध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दिवसभर अंगात ऊर्जा राहण्यासाठी ओट्स खायला हरकत नाही.
ड्राय फ्रूट – सुका मेवा खाल्ल्याने तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता. त्यामुळे वर्कआऊटआधी ड्राय फ्रूट खाणं चांगलं असतं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.