देव माझा विठु सावळा... गोकुळाष्टमीनिमित्त विठुरायाला खास पेहराव, गुराख्याच्या रुपात भूरळ घालतंय सोज्वळ रूप
देशभरात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्री 12 वाजता ठिकठिकाणी कृष्णजन्माचा जल्लोष पाहायला मिळाला.
विठ्ठल मंदिरात रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा झाला.
यावेळी शेकडो विठ्ठल भक्तांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती.
यापूर्वी विठुरायाला अनोख्या रुपात सजविण्यात आलं होतं.
डोक्यावर पगडी, अंगावर अंगी, धोतर आणि त्यावर मोठी कुंची घालण्यात आली होती.
गुराख्याचे रूप दिलेल्या विठुरायाच्या हातात चांदीची काठी देऊन देवाच्या मागे मोरपिसं लावण्यात आली होती.
विठुराया हा विष्णूचा अवतार असल्यानं विठ्ठल मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.
विठ्ठल सभामंडपात जन्माष्टमीचे कीर्तन सुरू असताना रात्री बारा वाजता पाळण्यात कृष्ण जन्माचा उत्सव करण्यात आला.
यावेळी भाविकांनी देवाच्या पायावर गुलाल, अष्टगंध वाहत दर्शन घेतलं.
पंढरपुरात भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
सावळ्या विठुरायाचं गोंडस रुप डोळ्यांत साठवण्यासाठी भाविक पंढरपुरात दाखल झाले होते.