Best Smartphones : जगात सर्वाधिक वापरले जाणारे 7 स्मार्टफोन, पाहा यादी; तुमच्याकडे कोणता स्मार्टफोन आहे?
2023 मधील जगभरातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन्स कोणते, पाहा यादी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppiPhone 14 Pro Max ची किंमत 1,43,990 रुपये आहे. हा फोन चार कॉन्फिगरेशन 1TB, 512GB, 256GB आणि 128GB स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. iPhone 14 Pro Max या फोनमध्ये 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे.
iPhone 14 Pro 1TB, 512GB, 256GB आणि 128GB च्या स्टोरेज पर्यायांसह चार कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आला. हा फोन तुम्ही 1,19,900 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच, iPhone 14 Pro मध्ये Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे.
Google Pixel 7 फोनमध्ये 6.3-इंचाचा FHD + डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 50MP प्राथमिक आणि 12MP दुय्यम कॅमेरा आहे.
Google Pixel 7 मध्ये सेल्फीसाठी 10.8MP फ्रंट कॅमेरा आहे. तर Google Pixel 7 फोन Tensor G2 प्रोसेसरवर चालतो, हा फोन 49,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
जगभरातील प्रसिद्ध स्मार्टफोनमध्ये सॅमसंगही आहे. Samsung Galaxy Z Fold 5 फोन 1,64,999 रुपयांना आहे.
Samsung Galaxy Z Fold 5 मध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. हा सॅमसंगचा दुसरा फोल्डिंग फोन असून याची स्क्रीन 7.6 इंच आहे.
imTECNO Phantom V Fold फोनमध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे. हा फोन MediaTek Dimensity 9000 चिपसेटवर चालतो.
TECNO Phantom V Fold फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, जो फोटोग्राफी प्रेमींसाठी फार उपयुक्त ठरेल. तुम्ही हा फोन 88,888 रुपयांना खरेदी करू शकता.
Samsung Galaxy Z Flip 5 5G फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या पर्यायामध्ये लाँच करण्यात आला आहे.
Samsung Galaxy Z Flip 5 5G ची किंमत 99,999 रुपये आहे. या फोनमध्ये 3700mAh आणि Android 13 OS ची पॉवर फुल बॅटरी आहे.
Samsung Galaxy S23 Ultra हा कंपनीचा पहिला प्रीमियम स्मार्टफोन तुम्ही Rs 1,34,999 मध्ये खरेदी करू शकता. या फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. तसेच, हा फोन Snapdragon 8 Gen 2 चिपसेट सह येतो.