Diwali Padwa Vitthal : सावळें सुंदर रूप मनोहर! पाडव्यानिमित्ताने विठ्ठल रुक्मिणी हिरेजडित अलंकारांनी मढले
सुनील दिवाण, एबीपी माझा
Updated at:
14 Nov 2023 09:30 PM (IST)
1
आज दिवाळी पाडव्यानिमित्त विठुरायाचे सुवर्णमयी रूप अधिकच खुलून दिसत असून रुक्मिणीमाताही सजली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दिवाळी पाडवा हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने आज विठुरायाला 23 प्रकारच्या मौल्यवान दागिन्यात मढविण्यात आले आहे.
3
अनेक अनमोल आणि खास ठेवणीतील दागिने आज देवाला परिधान करण्यात आले आहेत.
4
आज पाडव्यानिमित्त रुक्मिणी मातेलाही तब्बल 33 प्रकारचे ठेवणीतील अलंकार परिधान करण्यात आले आहे.
5
रुक्मिणीमाता देखील अतिशय ठेवणीतील पुरातन दागिन्यात सजली आहे.
6
देवाचे सुवर्णरूप पाहण्यासाठी देशभरातून हजारो भाविकांनी गर्दी केली आहे.