Health Tips : युरिक एसिडची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा
आपल्या शरीरात युरिक एसिडचं प्रमाण वाढलं. तर यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयोग्य आहार न घेतल्याने शरीरात युरिक एसिडची पातळी वाढते. यासाठी, तुमच्या घरात असलेले विनेगर देखील यावर रामबाण उपाय आहे.
लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरात गाठी तयार होतात असा एक गैरसमज आहे.
आरोग्य तज्त्रांच्या मते लिंबू पाण्याच्या सेवनाने युरिक एसिडची पातळी कमी होण्यास फार मदत होते.
आल्यामध्ये एन्टी इन्फ्लामेंटरी प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
यासाठी आल्याचं पाणी किंवा चहाचं सेवन करावं. यामुळे अनेक फायदे मिळतील.
तुम्हाला तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा देखील समावेश करणं गरजेचं आहे. यामुळे फक्त युरिक एसिडच नाही तर अनेक समस्या दूर होतील.
घरगुती पद्धतीने युरिक एसिड कमी करायचं असेल तर तुमच्या डाएटमध्ये हर्बलयुक्त गोष्टींचा समावेश करा. जसे की, कोथिंबीर, आलं, हळद.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.