भारतातील चीनचे राजदूत फेहाँग यांची सोलापूरला भेट
भारतातील चीनचे राजदूत एच.ई. झू फेहाँग आणि मुंबईतील चिनी महावाणिज्य दूत कॉंग झिंयान हुआ यांनी आज सोलापूर शहराला भेट दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धात जपानी आक्रमणावेळी चीनमध्ये येऊन केलेल्या लष्करी रुग्णसेवा बजावली होती. याच्याच स्मृती जगवण्यासाठी तसेच डॉ. कोटणीस यांना अभिवादन करण्यासाठी चीनचे राजदूत सोलापुरात आले होते.
यावेळी राजदूतानी डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मारकास भेट दिली. यावेळी सोलापूर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या बद्दल व त्यांच्या स्मारकासंदर्भात राजदूत एच.ई. झू फेहाँग यांना माहिती दिली.
चीनचे भारतातील राजदूत एच.ई. झू फेहाँग यांनी स्मारकातील म्युझियममधील सर्व छायाचित्रे पाहिली.तसेच चीनचे जनरल माओ स्ते यांनी त्यावेळी पाठविलेले कृतज्ञता संदेश पत्राचे अवलोकन केले.
सोलापूर महानगरपालिकेतर्फे जतन केलेल्या स्मारकाबाबत कृतज्ञता व्यक्त करून स्मारकाबद्दल समाधान व्यक्त केले.
त्यानंतर महापालिकेचे कॅम्प प्रशाला येथे सदिच्छा भेट देत चीनचे भारतातील राजदूत एच.ई. झू फेहाँग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या बलिदानाला स्मरणात ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साधावी असे आवाहन केले.
तसेच शाळेच्या विकासासाठी पुढे येऊन डॉ. द्वारकानाथ कोटणीस सारखे महान विद्यार्थी घडवण्यासाठी आणि सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू असे मत त्यांनी व्यक्त केले.