Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vitthal Temple Decoration : आमलिका एकादशीनिमित्त एक टन द्राक्षांचा वापर करुन विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट
आमलिका एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक टन द्राक्षांचा वापर करुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे आणि बारामती येथील भाविक बाबासाहेब रामचंद्र शेंडे, पूनम बाबासाहेब शेंडे आणि सचिन आण्णा चव्हाण यांनी या द्राक्ष सजावटीची सेवा दिली आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा देव्हारा, गाभारा, चौखांबी, सोळाखांबी द्राक्षांनी सजवण्यात आला आहे.
द्राक्षांची ही आकर्षक सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे.
आमलिका एकादशीचं औचित्य साधून केलेली ही मनमोहक सजावट विठ्ठल भक्तांसाठी अनोखी भेट ठरली आहे.
आज आमलिका एकादशी असल्यामुळे दर्शनासाठी मोठ्या संख्येन भाविक मंदिरात येत आहेत.
आमलिका एकादशीनिमित्त केलेल्या फुलांच्या सजावटीमुळे विठुराया आणि रुक्मिणीचं रुप अधिक खुलून दिसत आहे
फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलिका एकादशी असं संबोधलं जातं.
हिंदू धर्मात आमलिका एकादशीचं व्रत अतिशय शुभ समजलं जातं. हे व्रत करणाऱ्यांना समृद्धी, आनंद मिळतो.