विराटला प्रपोज, अर्जुन तेंडुलकरसोबत फोटो, गर्लफ्रेंडसोबत लग्न करणारी डॅनिअल वॅट कोण आहे
इंग्लंड महिला संघाची अष्टपैलू डॅनिअल वॅट हिने गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा उरकला आहे. वॅटने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून डॅनिअल वॅट आणि जॉर्जी हॉज डेट करत होत्या. आज त्यांनी साखरपुडा केला आहे. वेटने सोशल मीडियावर जॉर्जी हॉज हिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत साखरपुड्याची माहिती दिली. या बामतीमुळे तिचे चाहते भलतेच आनंदात आहेत. विशेष म्हणजे, तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षावही करत आहेत.
काही नेटकऱ्यांनी वॅटची फिरकी घेतली आहे. डॅनिअल वॅट हिने काही वर्षांपूर्वी विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज केले होते. तेव्हापासून डॅनिअल वॅट चर्चेत आली होती. डॅनिअल वॅटचे भारतामध्येही खूप चाहते आहेत.
डेनियल वॅट आणि जॉर्जी हॉज अनेक दिवसांपासून एकमेंकींना डेट करत होत्या. डॅनिअल वॅट इंग्लंड महिला संघातील महत्वाची सदस्य आहे. तर जॉर्जी सीएए बेस फुटबॉल महिला संघाची प्रमुख आहे.
महिला टी 20 विश्वचषकाचा थरार संपल्यानंतर डॅनिअल वॅट हिने आपला साखरपुडा उरकला आहे. हा विश्वचषक डॅनिअलसारखी सरासरी राहिला आहे. तिला खास कामगिरी करता आलेली नाही. डॅनियल वॅट आणि जॉर्जीने अधीच आपल्या नात्याला सार्वजनिक केले होते. सोशल मीडियावर दोघींचे अनेक फोटो आहेत. आज डॅनिअल वॅट हिने सोशल मीडियावर पोस्ट करत साखरपुड्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये डॅनियलने पार्टनर जॉर्जी हॉज हिच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत डॅनीच्या पार्टनरच्या हातात अंगठीदेखील दिसत आहे. “तू सदैव माझी” असे डॅनिअलने पोस्टमध्ये लिहिलेय.
अर्जुन तेंडुलकरसोबत फोटो शेअर केल्यामुळे डॅनिअल वॅट चर्चेत आली होती.