Mumbai Accident : मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेसवेवर टेम्पो आणि बसची धडक होऊन अपघात
Mumbai Accident : मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाकोला ब्रिजवर मध्यरात्री टेम्पो आणि बसमध्ये धडक होऊन अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला.
Mumbai Accident On Wester Express Highway
1/9
मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाकोला ब्रिजवर मध्यरात्री मोठी दुर्घटना झाली.
2/9
टेम्पो आणि बसमध्ये धडक होऊन अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. तर बसचा चालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला.
3/9
महत्त्वाचं म्हणजे या बसमध्ये कॅथे पॅसिफिक एअरलाईन्सचे कर्मचारी होते, जे ताज लॅण्ड्ल एंड हॉटेलमध्ये जात होते. हे सर्व कर्मचारी परिदेशी नागरिक आहेत.
4/9
अपघातात बसमध्ये असलेल्या एका महिलेच्या नाकाला दुखापत झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे
5/9
तसंच बसमधील सर्व कर्मचारी परदेशी नागरिक आहे आणि सर्व जण सुरक्षित आहेत.
6/9
अपघातामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.
7/9
तर टेम्पोमधून माशांची वाहतूक करण्यात येत होती. अपघातानंतर मासे रस्त्यावर पडले. यामुळे रस्ता देखील निसरडा झाला होता.
8/9
घटनास्थळावर उपस्थित मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान बसमधील कर्मचाऱ्यांची विचारपूस करत होते. पोलीस सध्या या दुर्घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.
9/9
मध्यरात्री 1.30 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात टेम्प चालकाचा मृत्यू झाला आहे तर बस चालकाने पोबारा केला आहे. त्याचा शोध सुरु असल्याची माहिती वाकोला पोलिसांनी दिली.
Published at : 03 Mar 2023 07:32 AM (IST)