अजय महाराज बारस्कर यांना पंढरपूरमध्ये येण्यापूर्वी बघून घेण्याची धमकी, नंतर कार जळून खाक, आषाढीच्या एकादशीच्या पहाटे काय घडलं?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं काही महिन्यांपूर्वी अजय महाराज बारस्कर चर्चेत आले होते. अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूर येथे जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App65 एकर येथील पार्किंगमध्ये अजय महाराज बारस्कर यांची गाडी जळाली. या प्रकरणी अजय बारस्कर यांनी पोलिसांत तक्रार दिली असून 1 लाखांचं नुकसान झाल्याचं म्हटलंय.
अजय बारस्कर यांनी दोन दिवासपूर्वी पंढरपुरात येण्या आधी आपल्याला धमकी येत असल्याचा आरोप करत व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता.
अजय महाराज बारस्कर पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर त्यांनी आपली MH 12 BP / 2001 ही टोयाटो कंपनीची कार , भाविकांच्या निवासा साठी उभारलेल्या 65 एकर येथील भक्तिसागर येथे पार्क करून स्नान व प्रदक्षिणेसाठी गेले होते . यानंतर एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली.
अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली असून यात कार कशाने तरी जळाली असल्याची तक्रार दिली आहे.
आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या बारस्कर यांची गाडी जळाल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असून पोलीस आता या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही व इतर माहितीच्या आधारे चौकशी करत आहेत.