Astro Tips : जेवताना ताटात केस आला तर...? कोणत्या गोष्टीचा मिळतो संकेत? वाचा नेमकं कनेक्शन
जेवणासंबंधित असं अनेकदा म्हटलं जातं की, अन्न जसं जेवाल..तसं तुमचं मन राहील. कारण शेवटी तेच तुमच्या जीवनाचा आधार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासाठीच शास्त्रात, अन्नासंबंधित अनेक महत्त्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जेवणाशी संबंधित नियम देखील सांगितले आहेत.
पण, तुम्हाला माहीत आहे का, जेवणाशी संबंधितसुद्धा शुभ-अशुभ घटनांचे संकेत मिळतात. जेवणात वारंवार केस आढळणं याच्याशी संबंधितसुद्धा एक संकेत आहे.
जर तुम्हाला जेवताना वारंवार जेवणाच्या ताटात किंवा तोंडात केस येत असेल तर सर्वात आधी ते अन्न ग्रहण करू नका. जेवणात वारंवार केस आढळणं शुभ लक्षण नाही. मान्यतेनुसार, यामुळे घरात अशुभ राहूचा प्रभाव असतो.
जर तुमच्या कुंडलीत राहू अशुभ असेल तर तो फक्त तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या आर्थिक बाबतीत देखील तुमचं प्रचंड नुकसान करतो.
तसेच, जेवणात केस निघणं हे पितृ दोषाचा देखील संकेत असू शकतो. जर तुम्ही जेवणाला बसला असाल आणि तुम्हाला त्यात केस दिसला तर तो पितृ दोषाचा संकेत आहे.
असं म्हणतात की, ज्या घरात पितृ दोष असतो त्या घरात जेवण बनवताना किंवा जेवताना अनेक अडचणी निर्माण होतात.
जर तुमच्याबरोबर देखील असं घडत असेल तर त्वरित राहू आणि पितृ दोष संबंधित उपाय करा. आणि जेवताना केस बांधा तसेच, जेवण बनवतानासुद्धा स्वच्छता ठेवा.