PHOTO : गोरडवाडी इथे बिरोबा यात्रेनिमित्ते भव्य शेळी-मेंढरांचा महोत्सव
माळशिरस तालुक्यातील बिरोबा यात्रेनिमित्त गोरडवाडी येथे शेळी मेंढी यात्रा महोत्सव भरवण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यात्रेमध्ये शेळ्या-मेंढ्या सजवून बाजारात आणल्या होत्या.
बिरोबा यात्रेत महाराष्ट्रातून मेंढपाळ वर्ग दाखल झाला होता.
शेळ्या-मेंढ्यासाठी बाजारात विक्रीसाठी घुंगराचे पट्टे, घुंगरी, लोकर कातरण्यासाठी कात्री, सुती कापडाच्या रंगीबेरंगी छटणी विकण्यासाठी आल्या होत्या.
शेळी-मेंढरांच्या या यात्रेत मांडग्याळ जातीचे, विजापूर जातीचे, तसेच गावठी नर,उस्मानाबादी शेळी, बिटल जातीच्या शेळ्या आणि बोकड, आफ्रिकन बोअर, शिरोही अशा अनेक प्रकारच्या शेळ्या आणि मेंढ्या होत्या.
विविध प्रकारच्या शेळ्या-मेंढ्यांच्या जातीच्या नरांना यात्रेत चांगल्या किमती मिळत असल्याने शेतकऱ्यांनाही चांगला फायदा झाला.
या यात्रेमध्ये हौशी लोक आवडीने मांडग्याळ आणि बिटल जातीचे बोकड आणि मेंढ्या पाळण्यासाठी खरेदी करत होते.
या बाजारामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरातून जातिवंत शेळ्या मेंढ्या विक्रीसाठी आणल्या होत्या.
बाजारात बकऱ्याची हौस म्हणून डॉल्बी, हलगीच्या कडकडाट आवाजात फटाक्याच्या, तोफांच्या आतषबाजीने तसंच गुलालाची आणि भंडाऱ्याची उधळण करुन जल्लोष करण्यात आला.