PHOTO: मर्सिडीजकडून जर्मनीबाहेर इलेक्ट्रिक कार बनण्याचा मान फक्त पुण्यातील प्रकल्पालाच!
मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, ही कार 30 सप्टेंबर रोजी लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी भारतात याची किंमत 2.45 कोटी रुपये (एक्स-शोरूम) ठेवू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातच आता Mercedes ने आपल्या इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी भारताची निवड केली आहे. कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. या नवीन इलेक्ट्रिक कारची निर्मिती Mercedes-Benz जर्मनीनंतर फक्त पुण्यात करत आहे.
आगामी EQS 580 4MATIC कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. हे फीचर्स आधुनिक असण्यासोबतच स्मार्ट आहेत. यासोबतच या कारचा लूकही स्टायलिश आहे. ही कार देशातील पहिली मेड इन इंडिया लक्झरी इलेक्ट्रिक कार (Made In India Mercedes Electric Car) आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ.
भारतीय बाजारपेठेचं महत्व ओळखून Mercedes-Benz ने ही कार देशात बनवण्याचा निर्णय घेतला असावा, असं बोललं जात आहे. या अपकमिंग कारची कंपनीच्या पुण्यातील चाकण (Pune, Chakan) येथील प्लांटमध्ये निर्मिती (Mercedes Electric Car Made In Pune) करण्यात आली आहे.
ही देशातील पहिली स्वदेशी लक्झरी इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरु केली आहे.
ग्राहक ऑनलाइन किंवा जवळच्या मर्सिडीज-बेंझ डीलरशिपला भेट देऊ ही कार बुक करू शकतात. Mercedes EQS 580 4MATIC ही भारतातील आतापर्यंतची सर्वात लांब रेंजची कार असले, असं बोललं जात आहे. तसेच ही पहिली ARAI-प्रमाणित लक्झरी ईव्ही (EV) असेल.
आगामी Mercedes-Benz EQS 580 मध्ये 107.8 kWh ची लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळू शकतो.
या EV ची रेंज सुमारे 750 किलोमीटर असल्याचा दावा केला जात आहे.
ज्यामुळे ही देशातील सर्वात लांब पल्ला गाठणारी इलेक्ट्रिक कार ठरू शकते. या कारला 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यास फक्त 4.1 सेकंद लागतात.