Whale Vomit : सिंधुदुर्गात मच्छीमारांना सापडली देवमाशाची उलटी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आठ कोटीचा भाव
सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील देवबाग समुद्र किनारी एका मच्छीमाराला देवमाशाची उलटी सदृश्य पदार्थ आढळून आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछोट्या मोठ्या सात ते आठ तुकड्यांमधील हा 7 किलो 900 ग्रॅम वजनाचा पदार्थ मच्छीमारांनी वनविभागाच्या ताब्यात दिला.
हा पदार्थ देवमाशाची उलटी अर्थात अंबरग्रीस आहे किंवा नाही याचा शास्त्रोक्त तपासणीसाठी तो नागपूर येथील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
हा पदार्थ अंबरग्रिस असल्यास बाजारभावानुसार या पदार्थाची किंमत सुमारे 7 कोटी 90 लाख रुपये होऊ शकते.
अंबर ग्रीस हा सुगंधी पदार्थ असतो. तो फार दुर्मिळ असतो, सहज सापडत नाही.
व्हेल माशाची उलटी किंवा अंबरग्रीस जमवणे आणि विकणे हे बेकायदेशीर आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर या उलटीची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असते.
उंच दर्जाची आणि किमती अत्तरे, सेंट तयार करण्यासाठी या उलटीचा वापर होत असतो.
व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे.
मात्र, वन्यजीव अधिनियमानुसार त्याच्या हाताळणी विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.