Nashik Cycle Wari : हरिनामाच्या जयघोषात सायकल वारीचं पंढरपूरकडे प्रस्थान
सायकल वारीने नाशिकहून पंढरपूरकडे आज पहाटे 6 वाजता प्रस्थान केले असून यंदाचे त्यांचे हे अकरावे वर्ष आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोविंदनगर परिसरात जवळपास दोनशे सायकलिस्ट एकत्र आले.
त्यानंतर ढोल ताशाच्या तालावर हरिनामाचा जयघोष करण्यात येऊन वारीला सुरुवात झाली.
यंदा विठ्ठलाचा पालखी रथही तयार करण्यात आला आहे.
या वारीतून सायकलचे महत्व पटवून देण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचाही संदेश देण्यात येत आहे.
200 झाडे सोबत घेऊन पंढरपूरला ते वृक्षारोपण करणार आहेत.
पहिल्याच दिवशी पावणे दोनशे किलोमीटर अंतर पार केल्यानंतर अहमदनगरला पहिला मुक्काम असणार आहे.
10 जूनला पंढरपूरला नाशिकसह राज्यभरातून जवळपास 4 हजार सायकलिस्ट एकत्र येणार आहेत.
11 जूनला सकाळी प्रभात फेरी काढली जाईल आणि त्यानंतर विठूरायाचे दर्शन घेऊन रात्री सायकलिस्ट माघारी फिरतील.