Home Loan: तुमच्या कर्जाचा EMI अन् FD व्याज कमी होणार? जाणून घ्या, RBI च्या निर्णयाचा काय परिणाम होणार?

RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीनं रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम आहे.

Continues below advertisement

RBI Repo Rate | Home Loan

Continues below advertisement
1/8
चालू आर्थिक वर्षात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा आरबीआयनं रेपो दर स्थिर ठेवला आहे. स्थिर चलनवाढ लक्षात घेऊन आणि अंदाजाच्या आधारे रिझर्व्ह बँकेनं असा निर्णय घेतला आहे. 8 जून रोजी घेतलेल्या या निर्णयांमुळे कर्जाचे व्याजदर आणि एफडी ठेवींवर परिणाम होऊ शकतो.
2/8
कर्जावर परिणाम : जर तुम्ही बँकेकडून कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलं असेल तर काही बदल होऊ शकतात. बाह्य बेंचमार्कशी निगडीत फ्लोटिंग-रेट कर्ज असलेल्या ग्राहकांसाठी व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही. इकोनॉमिक टाईम्सनं दिलेल्या एका अहवालात तज्ज्ञाचा हवाला देऊन, असं म्हटलं आहे की, एमसीएलआर आणि इतर बेंचमार्कशी निगडीत फ्लोटिंग रेट कर्जांमध्ये बदल पाहिले जाऊ शकतात.
3/8
FD वर परिणाम : स्थिर रेपो रेटमुळे काही बँका एफडी दर कमी करू शकतात. इकोनॉमिक टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करणार असाल, तर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता, जेणेकरून FD दर समान राहतील.
4/8
2023-24 मध्ये महागाई दर 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे. एप्रिल महिन्यातील महागाई दर 4.7 टक्के जो मागील वर्षातला सर्वात कमी आहे.
5/8
भारतीय हवामान विभागाकडून मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगाम कसा असेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मान्सूनची अनिश्चितता, साखर, तांदूळ आणि क्रूड तेलाच्या किंमती यामुळे महागाईत भर पडण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
6/8
RBI ने बँकांना RuPay प्रीपेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी दिली आहे, ज्याचा वापर ATM, POS मशीन आणि परदेशातील ऑनलाईन व्यापार्‍यांना करता येईल.
7/8
महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या वर्षी मे 2022 पासून, आरबीआयनं रेपो दरांत विक्रमी वाढ केली होती, ज्यामुळे रेपो दर आता 4 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.
8/8
रेपो रेटमुळे थेट बँकेच्या कर्जावर परिणाम होतो. जेव्हा रेपो रेट कमी होतो, तेव्हा कर्ज स्वस्त होतं आणि ज्यावेळी रेपो रेट वाढतो, त्यावेळी बँका देखील त्यांचं कर्ज महाग करतात. त्याचा परिणाम होम लोन (Home Loan), ऑटो लोन (Auto Loan), पर्सनल लोन (Personel Loan) अशा सर्व प्रकारच्या कर्जांवर होतो.
Sponsored Links by Taboola