सिंधुदुर्गात भयावह परिस्थिती; घरांना पुराच्या पाण्याने वेढले, अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली!
सिंधुदुर्गात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्गातील तेरेखोल नदी, कर्ली नदी, वाघोटन नदी इशारा पातळीच्या वर वाहत असून नद्या पात्राबाहेर वाहत आहेत.
अनेक घरांमध्ये पुराचे पाणी गेले तर भातशेती पाण्याखाली गेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले. वैभववाडी मधील तीथवली येथे मुसळधार पावसामुळे घर कोसळलं.
कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीच्या पुराच्या पाण्यात रस्ता उखरून खड्डा पडल्याने 27 गावांचा संपर्क तुटला.
दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथे पुलावर पाणी आलं असतानाही बोलेरो गाडी घातल्याने तिघे जण वाहून गेले होते, रात्री त्यांना स्थानिक आणि प्रशासनाने सुखरूप बाहेर काढलं.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या 12 तासांपासून ठप्प आहे. सिंधुदुर्गात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे.