तळकोकणातील सुपुत्राची धडाकेबाज कामगिरी; 62व्या राज्य कला प्रदर्शनात साकारलं शिल्प, पटकावलं सुवर्णपदक
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आकेरी गावचा जयेश धुरी यानं राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकला क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
लहान वयातच अद्भूत अदाकारी दाखवत आकेरी या छोट्याशा गावातील युवा शिल्पकार जयेश धुरी या विद्यार्थ्यानं अख्ख्या महाराष्ट्राला दिली.
उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग कला संचालनालयातर्फे महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा 62व्या राज्य कला प्रदर्शनातील शिल्पकला स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 200 हून अधिक कला महाविद्यालयं सहभागी झाली होती.
या स्पर्धेत विद्यार्थी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयात शिकत असलेल्या जयेशने आपल्या अद्भुत कलेनं प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जयेश धुरीनं सुवर्णपदक पटकावत राज्यभरातील शिल्पकारांचं लक्ष वेधून घेतलंय.
हुबेहूब कलाकृती साकारत जयेशनं सुवर्णपदक पटकावलं आहे.
पुढील महिन्यातील तीन तारखेला जयेशला सुवर्णपदक, सन्मानपत्र आणि महाराष्ट्र शासनाच्या रोख रकमेचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाणार आहे.
सिंधुदुर्गवासीयांच्या दृष्टीनं ही अभिमानास्पद बाब आहे. लहानपणापासूनच चित्रकला, शिल्पकलेची आवड जयेशला होती.